Latest News

Navi Mumbai : बालवाड़ी शिक्षिकाओं और सहायिकाओं के वेतन वृद्धि की मांग; श्रमिक सेना ने महापौर को सौंपा ज्ञापन

गणेशोत्सव २०२६ | एपीएमसी और एनआरआई पुलिस स्टेशन ने दिया साइबर अपराध और नशा मुक्ति का संदेश

एसटी के बेड़े में शामिल होंगी 200 अत्याधुनिक वॉल्वो बसें: परिवहन मंत्री प्रताप सरनाईकऑनलाइन बुकिंग से लेकर हॉस्पिटैलिटी सेवाओं तक, यात्रियों को मिलेंगी आधुनिक सुविधाएं

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनात १४३१८ श्रीगणेशमूर्तींसह २२३० गौरींचे भावपूर्ण विसर्जन

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याची मागणी

October 2, 2026
Follow Us:

‘महाराष्ट्र भूमि’ एक विश्वसनीय हिंदी/अंग्रेजी समाचार पत्र है। हमारा मानना है कि पत्रकारिता केवल सूचना देना ही नहीं, बल्कि समाज को सशक्त बनाना भी है। इसीलिए, हम ‘सकारात्मक पत्रकारिता’ के सिद्धांत पर चलते हैं—ऐसी खबरें जो समाज को जागरूक करें, सशक्त बनाएं और राष्ट्र निर्माण में सकारात्मक योगदान दें।

Quick Contact:

महाराष्ट्र भूमिशहरनवी मुंबईसेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

सेवा संकल्प अभियानातील ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत जागतिक बांबू दिवसाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान ७.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बांबू वृक्ष लागवड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वृक्षलागवडीत लोकप्रतिनिधींसह पर्यावरणप्रेमी नागरिकही उत्साहाने सहभागी झाले.

बांबू हा जलद वाढणारा आणि पर्यावरणाला भरपूर प्राणवायू देणारा वृक्ष असल्याने नवी मुंबईतील हरित क्षेत्राचा पर्यावरणपूरक विकास होण्याच्या दृष्टीने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्राधान्याने देशी वृक्षलागवड करण्याचे महापालिकेने निश्चित केले असून त्यास अनुसरून विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीमा मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जागतिक बांबू दिवसाचे औचित्य साधून 18 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकस्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत बांबू वृक्ष लागवडीची मोठी मोहीम हाती घेण्यात आली.

उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांच्या नियंत्रणाखाली 8 विभागात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहीमांमध्ये विद्यार्थी, नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, नगरसेविका ॲड.भारती पाटील, नगरसेवक श्री.डी. आर. पाटील, नगरसेविका श्रीम.दिक्षा कचरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वच ठिकाणी संबंधित कार्यालयाचे विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता उपस्थित होते. विशेषत्वाने संत निरंकारी संस्था कोपरखैरणे या सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यही या मोहीमेत सहभागी झाले होते.

यावेळी –

        बेलापूर: सेक्टर ८ डॅम परिसर - २५ बांबू झाडे

        नेरुळ: सायकल ट्रॅक, सेक्टर १९ - २५ बांबू झाडे

        सानपाडा: ट्री बेल्ट, सेक्टर ३० - ३५ बांबू झाडे

        वाशी: एपीजे अब्दुल कलाम उद्यान, सेक्टर १० - २२ बांबू झाडे

        कोपरखैरणे: शांतिदूत महावीर उद्यान, सेक्टर २३ - ३८० बांबू झाडे

        घणसोली: भूखंड क्रमांक २७, सेक्टर १५ - २५ बांबू झाडे

        ऐरोली: स्मशानभूमी परिसर, सेक्टर २० - ६० बांबू झाडे

        दिघा: बालमित्र साने गुरुजी उद्यान - १५ बांबू झाडे

अशा आठ विभागांतील मुख्य ठिकाणी तसेच इतर विविध ठिकाणी मिळून एकूण 1200 हून अधिक बांबू वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी नागरिकांसह सहभागी होत वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रसारित केला. सेवा संकल्प अभियानामध्ये महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये उद्यान विभागामार्फत अशा प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या संख्येने हाती घेण्यात येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post