नवी मुंबई शहरात कर्तव्यात कसूर आणि बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निलंबनाचा मोठा बडगा उगारला आहे. दोन वेगवेगळ्या गंभीर प्रकरणांची दखल घेत एकाच वेळी दोन बड्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात एका ८ महिन्यांच्या गर्भवती माता सोनम डोंगरे यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी वैद्यकीय उपचारात गंभीर हलगर्जीपणा केल्याबद्दल स्त्रीरोग तज्ञ डॉ. भावना पगारे यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
तर नेरूळ एल.पी. नाका पुलाखाली पावसाच्या पाण्यात विद्युत केबलचा संपर्क आल्याने दोन निष्पाप विद्यार्थिनींना विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी अपघात घडला. या गंभीर प्रकरणात कार्यालय प्रमुख म्हणून कामावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण गाडे यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र भूमिशहरनवी मुंबई1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

