Latest News

August 14, 2026
Follow Us:

Latest News

August 14, 2026
Follow Us:

‘महाराष्ट्र भूमि’ एक विश्वसनीय हिंदी/अंग्रेजी समाचार पत्र है। हमारा मानना है कि पत्रकारिता केवल सूचना देना ही नहीं, बल्कि समाज को सशक्त बनाना भी है। इसीलिए, हम ‘सकारात्मक पत्रकारिता’ के सिद्धांत पर चलते हैं—ऐसी खबरें जो समाज को जागरूक करें, सशक्त बनाएं और राष्ट्र निर्माण में सकारात्मक योगदान दें।

Quick Contact:

महाराष्ट्र भूमिशहरनवी मुंबईएसआयआर गणनापत्रांसाठी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ठिकठिकाणी विशेष कॅम्प
एसआयआर गणनापत्रांसाठी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ठिकठिकाणी विशेष कॅम्प

एसआयआर गणनापत्रांसाठी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ठिकठिकाणी विशेष कॅम्प

• मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) 30 जूनपासून सुरू असून मतदारांची गणनापत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

• या अंतर्गत नागरिकांना अधिक सोयीचे व्हावे यादृष्टीने मागील आठवड्याप्रमाणेच याही शनिवार, रविवार अशा सुट्ट्यांच्या दिवशी तसेच सोमवारीही सलग 3 दिवस दि. 1, 2 व 3 ऑगस्ट 2026 रोजी विभागाविभागांमध्ये ठिकठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करून संबंधित भाग क्रमांकाच्या बीएलओंना जास्तीत जास्त गणनापत्रे (Enumeration Form) वाटप, त्या गणनापत्रांचे संकलन आणि त्यांचे डिजिटलयझेशन करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेले आहेत.

• विशेषत्वाने मतदान केंद्रांच्याच ठिकाणी हे विशेष कॅम्प असणार असून याव्यतिरिक्तही नागरिकांना सुविधाजनक होतील अशा काही मध्यवर्ती जागा विशेष कॅम्पसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

• या विशेष कॅम्पच्या स्थळांची यादी 150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1Bfe5CktY8/ या लिंकवर तसेच 151 बेलापूर करिता  https://www.facebook.com/share/p/17jfzFuWJu/  या लिंकवर सहज उपलब्ध आहे.

• नागरिक आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांकानुसार बीएलओ यांची त्या ठिकाणी भेट घेऊन आपली एसआयआर गणनापत्र (Enumeration Form)   भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात.

            • आपल्या मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ कोण आहेत याची माहिती 150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1DWA4rSkHv/ या लिंकवर तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/19FVzXaDvf/  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

• याशिवाय नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी  काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये –

• बीएलओ यांनी 3 वेळा गृहभेटी देऊनही मतदार सापडला नाही तर नाव यादीतून वगळले जाण्यापूर्वी रितसर पंचनामा करावा.

• मतदार यादीत दुबार (Duplicate) नाव आढळल्यास मतदाराच्या संमतीने कोणत्याही एका ठिकाणच्या मतदार यादीत नाव ठेवावे व दुस-या ठिकाणचे वगळावे.

• बीएलओ यांनी गणनापत्रे स्विकारण्याप्रमाणेच गणनापत्राच्या डिजीटलायझेनवर भर द्यावा.

• गणनापत्र संकलन आणि डिजीटलायझेशन कामासाठी पुढील 5 दिवस एनएसएस विद्यार्थ्यांची तात्पुरती नेमणुक करून त्यांचे सहकार्य घ्यावे.

• सर्वात कमी कामगिरी असणा-या खालील 10 क्रमांकाच्या बीएलओंच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात व त्यांच्या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा.

• नागरिकांनी बीएलओ यांना संपर्क केला आहे, मात्र बीएलओ यांच्यामार्फत त्यांना उत्तर दिले गेले नाही अशा नागरिकांशी त्वरित संपर्क साधावा आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे.

• याशिवाय  Absent, Shifted, Death, Duplicate  (ASDD)  असे वर्गीकरण करुन त्‍यांची स्वतंत्र यादी तयार करावी असेही बीएलओ यांना निर्देशित करण्यात आले आहे.

• सोबतच Photo Similar Entry, Demographic Similarity, Non Standard Photo या बाबींकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

• नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली मतदारसंघात 82.88 % गणनापत्रांचे वाटप झालेले असून 36.17 % गणनापत्रांचे डिजीटलायझेशन झालेले आहे तसेच 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघात 89.55 % गणनापत्रांचे वाटप झालेले असून 42.62 % डिजीटलायझेशन झालेले आहे. त्यामुळे गणनापत्र दाखल करण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतचा कमी कालावधी लक्षात घेता गणनापत्र वाटप, संकलन आणि डिजीटलायझेशन या तिन्ही बाबींना गती देण्याची गरज आहे. त्याकरिता सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या विभाग क्षेत्रातील सर्व जनप्रतिनिधी यांच्या मिटींग घ्याव्यात व त्यांना नागरिकांपर्यंत गणनापत्र भरण्याचे महत्व पटवून देण्याचे आवाहन करावे, त्याचप्रमाणे सोसायट्यांमधील पदाधिका-यांकडूनही बीएलओंनी सोसायटी भेट दिली असल्याची पत्रे घेण्यात यावीत तसेच व्हीआयपी मतदारांपर्यंत पोहचून त्यांची गणनापत्रे भरून घ्यावीत व त्यांच्यामार्फतही नागरिकांना आवाहन करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.• गणनापत्रे न भरल्यास त्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाईल व पुन्हा मतदार यादीत नाव येण्यासाठी फॉर्म नं. 6 भरून नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागेल याची जाणीव ठेवून नागरिकांनी या विशेष कॅम्पमध्ये आपल्या भाग क्रमांकाच्या बीएलओशी संपर्क साधून गणनापत्र भरून घ्यावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post